खोडद भूषण पुरस्कार देऊन ग्रामस्थांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

खोडद : दि. २७/०१/२०२३.

बातमी : कार्यकारी संपादक – किरण वाजगे / विभागीय संपादक रवींद्र खुडे

पुणे जिल्ह्यातील खोडद हे गाव एक ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध असुन, अलीकडे ते एक वैज्ञानिक केंद्र म्हणूनही जगामध्ये ओळखले जाऊ लागलेय. ऐतिहासिक नारायणगड (किल्ला) तर येथे आहेच परंतु त्याच्या पायथ्याशी GMRT (Giant Metrewave Radio Telescope) ही रेडिओ दुर्बीण, TIFR (Tata Institute of Fundamental & Research) या जागतिक लेव्हलच्या भारतीय संशोधन संस्थेने तयार करून देशाला समर्पित केलेली आहे. की जिथून अवकाश संशोधन चालू असते. मराठा साम्राज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील लढवय्ये सैनिकांबरोबरच विज्ञान युगातील बुद्धिजीवी वर्गही या मातीत घडतो आहे. अनेक उच्च पदस्थ व्यक्ती जुन्नरच्या या मातीतून घडलेत. अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच खोडदकर ग्रामस्थ टाकत असतात.
त्याच पार्श्वभूमीवर २६ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या ध्वजारोहन कार्यक्रमावेळी, खोडदच्या गुणवंत व्यक्तींचा यथोचित असा सन्मान करण्यात आला.

त्यात –
१) राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत न्यायाधीश झालेला आकाश हरिभाऊ तट्टू,
(२) महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मेरिट मध्ये आलेली कु. पुर्वा रवींद्र खुडे,
(३) शेतीक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, दिल्लीच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय उद्योजक हा देशपातळीवरील पुरस्कार मिळविलेले एकनाथ देवराम थोरात व
(४) GNM या नर्सिंग कोर्स मध्ये KEM मधुन दुसरा क्रमांक मिळविलेली कु. स्नेहल दत्तात्रय गायकवाड, या चौघा गुणवंतांचा खोडद ग्राम पंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने खोडद भूषण हे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावर खोडद ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मनीषा संदीप गुळवे व ग्रामविकास अधिकारी श्री राजू किसन कोंढवळे यांची स्वाक्षरी आहे. सोबतच ग्रामविकास मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. तसेच मुक्ताई वंचित आधार प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. यावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर डोंगरे मामा, उपाध्यक्ष शरद पोखरकर व सचिव किसन गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या असुन, ग्रा. पं. सदस्य गणपत वाळुंज सो, प्रकाश अण्णा गायकवाड, आनंदा आंधळे गुरुजी, मधुकर राऊत, मारुती सोनवणे, अनंथा मुळे, डॉ निवृत्ती पोखरकर, ज्ञानेश्वर कुचिक, पापाभाई तांबोळी यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे “शाम ची आई” हे सुप्रसिद्ध व संस्कारक्षम पुस्तक देखील भेट देण्यात आलेय.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडद व महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या जाहीर कार्यक्रमावेळी सरपंच मनीषा गुळवे, उपसरपंच सविता गायकवाड, पोलीस पाटील सुहास थोरात, ग्रा. पं. सदस्या निर्मला थोरात, शालेय समिती अध्यक्षा दीपाली थोरात व नीलम काळे, सदस्या शुभांगी विकास तट्टू, ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रवी वामन, उपाध्यक्ष पंढरीनाथ खरमाळे, माजी सरपंच जा द डोंगरे मामा, माजी सरपंच विश्वास घंगाळे, जगदंबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत पोखरकर, तंटामुक्ती अध्यक्ष पंकज कुचीक व उपाध्यक्ष शरद पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते अवधूत खरमाळे, ग्राम पंचायत सदस्य रवी मुळे व गणपत वाळुंज साहेब, ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष सुदाम गायकवाड, जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अंबिका पतसंस्थेचे उपाध्यक्ष संतोष पटाडे, अंबिका पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. संतोष गायकवाड, संचालक संदीप गुळवे, माजी संचालक पंढरीनाथ खुडे, तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष व मुक्ताई पाणी वापर संस्थेचे संचालक संतोष काळे, सामाजिक कार्यकर्ते बाबा डोके व शिवाजी काळे, माजी सरपंच शंकर थोरात, माजी पोलीस पाटील शंकर शिंदे, माजी सरपंच बबु एरंडे, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष संजय कुचिक, ग्रामविकास मंडळाचे सदस्य विशाल पानमंद, माजी ग्रा पं सदस्य दत्तात्रय गायकवाड, संतोष गायकवाड (अभियंता ऑस्ट्रेलिया), राहुल वामन, सलीम तांबोळी, संतोष बबन गायकवाड, संतोष मामा मुळे, पंकज कुचिक, मुख्याध्यापक पाचपुते सर व जी प प्रा शा मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम, त्यांचा संपूर्ण स्टाफ आदी मान्यवर, तसेच विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे न्यायाधीश ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आकाश तट्टू यांच्या हस्ते खोडद ग्रा. पं. चे झेंडावंदन करण्यात आले. सरपंच मनीषा गुळवे यांनी स्वतःचा मान नूतन न्यायाधिशांना देऊन गावच्या वतीने जो सन्मान केला, त्याबद्दल सरपंच व खोडद ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *