विभागीय संपादक रामदास सांगळे
बेल्हे (ता.जुन्नर) गावचे सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन झाल्याने सरपंच पदाची निवडणूक सोमवार (दि.३) रोजी पार पडली. या सरपंच पदाच्या जागेवर गोट्याभाऊ वाघ यांची निवड झाली.
गावचे शिवसेना पुरस्कृत सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांच्या निधनाने गावात सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत गोट्याभाऊ वाघ हे सरपंच झाले.या पदासाठी चार अर्ज आले होते.पडताळणीत एक बाद झाला तर राष्ट्रवादीच्या लीला बोरचटे यांनी अर्ज माघे घेतला.राष्ट्रवादी पक्षाचे गोट्याभाऊ वाघ व शिवसेनेचे बबन औटी या दोघांसाठी मतदान झाले. सतरा सदस्यांनी मतदान केले.गोट्याभाऊ वाघ यांस १० मत तर बबन औटी यांस ७ मते मिळाली.तीन मताच्या फराने गोट्याभाऊ वाघ हे निवडून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चौरे यांनी दिली.