भाजपच्या दोन्ही आमदारांनी दुकाने नव्हे तर “मॉलच उभे केले.” राष्ट्रवादीचे आधारवड शरद पवार यांनी केला हल्लाबोल.

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

पिंपरी-चिंचवड़

शरद पवार यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर हल्लाबोल केला

भाजपच्या दोन्ही आमदारांनी पिंपरी चिंचवड शहर वाटून घेतले. इकडची बाजू तुझी तिकडे बाजू माझी, तिकडची तुझी असे वाटपच करून घेतले. या आमदारांनी केवळ दुकाने मांडली नसून स्वतःचे मॉल च उभे केले. असा हल्लाबोल शरद पवार यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केला.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निगडी यमुना नगर दुर्गा चौक येथील सिझन्स बँक्वेट हॉल येथे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी राम धारिया, शमीम पठाण, पंडित गवळी, किरण मोटे, तानाजी खाडे, संतोष कुदळे, रामभाऊ पिंपळे, विनायक रणसुभे आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

ही तुझी बाजू , ही माझी बाजू

पिंपरी-चिंचवड शहरात नात्यागोत्याचे राजकारण चालते. त्यातूनच मावळ लोकसभा मतदार संघातून तीनही वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. २००९ मध्ये आझम पानसरे २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि २०१९ मध्ये पार्थ पवार यांच्या पराभवाला आपलेच लोक कारणीभूत आहेत. आझम पानसरे यांना उमेदवारी दिली होती तेव्हा त्यावेळी जातीपातीचे राजकारण आडवे आले. तर राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गाववाले बाहेरचा मुद्दा कळीचा ठरला. आता २०१९ मध्ये पवार घराण्यातील पार्थ पवार उमेदवार असतानाही नातीगोती, गावकी भावकीच्या राजकारणातून आपल्याच लोकांनी मनापासून काम न केल्याने पार्थ चा बळी दिला. असल्याची तक्रार माजी नगरसेवकांनी केली. गाववाल्यांचे जातीपातीचे व भावकीचे राजकारण पक्षालाच घातक ठरत आहे त्यामुळे पक्ष वाढत नाही. पक्षाचे नुकसान होते. पक्षाच्या आत्ताच्या शहर कार्यकारिणीत एकसूत्रता नाही. अध्यक्ष संजोग वाघेरे कायम गोंधळलेले असतात. सत्ताधारी भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यात आपले लोक कमी पडतात. अशा तक्रारी माजी नगरसेवकांनी पवार साहेबांकडे केल्या.

माजी नगरसेवकांच्या भावना ऐकून घेऊन शरद पवार म्हणाले, “सर्वांनी एकत्र रहावे, भवविष्यात सर्वाना संधी दिली जाईल. धोका पत्करू पण ५०% नवे सुसक्षित, गरीब असले तरीही सामाजिक जाणीव असलेले तरुण मला उमेदवार म्हणून दिसायलाच हवेत,” असेही पवार म्हणाले. आपण शहरात एमआयडीसी आणली. शहराचा चेहरा मोहरा बदलला. पण या दोन आमदारांनी शहर वाटून घेतले. दुकाने नव्हे तर मॉल उभे केले. ही तुझी बाजू , ही माझी बाजू असे वाटपच केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *