दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या २ दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक

बेल्हे दि.२४ (विभागीय संपादक रामदास सांगळे):- झापवाडी (ता.जुन्नर) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन इसमांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.२३) पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास झापवाडी गावचे हद्दीतील एका वस्तीवरील घरावर ५ दरोडेखोर दरोडा घालण्याचा’ प्रयत्न करत होते.यावेळी घरातली रहिवाशांना जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केले. आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी घरावर दगडफेक करून व दहशद निर्मिण करुन मंगरुळ गावचे फॉरेस्ट बाजूला दोघे पळून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले.सदर घटनेची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली.

पोलिसांनी तात्काळ गावातील चार ही रस्त्यावर नाका-बंदी करून त्यापैकी एक मोटर सायकल चा पाठलाग करून दोन दरोडेखोर पकडले. त्यापैकी एक इसम फॉरेस्ट जंगलात पळून गेला. पोलिसांनी पकडलेल्या दोघांकडे कटावणी ,कोयता ,मोसा व इतर दरोड्याचे साहित्य असे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचे सोबत चे पळून गेलेले इतर ३ इसमानची नाव निष्पन्न झाले आहेत. सदर बाबत आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी ३९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.

सदरचे कामगिरी ही पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक संदीप फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे ,होमगार्ड शिरतर या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *