पीएमपीएलचे एकाच दिवसात २ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न

१६ नोव्हेंबर २०२२

पुणे


पीएमपीएलला सोमवारी एकाच दिवसात विक्रमी उत्पन्न मिळाले. एका दिवसात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. पीएमपीला सोमवारी एकाच दिवसात दोन कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. सोमवारी दिवसभरात १३ लाख प्रवाशांनी पीएमपी बसच्या माध्यमातून प्रवास केला, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून पीएमपीचा दैनंदिन उत्पन्नाचा टप्पा पार झाला आहे. पीएमपीच्या बस सेवेचा वापर प्रवाशांनी सोमवारी (दि. १४) रोजी इतर दिवसांपेक्षा अधिक केल्याचे समोर आले आहे.

इतर दिवशी पीएमपीला दिवसाला १ कोटी ६० ते ७० लाखांच्या घरात उत्पन्न मिळते. मात्र, सोमवारी २ कोटी रूपये एवढे विक्रमी उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे. या दिवशी १ हजार ६५७ बस संचलनात होत्या. २०१६ नंतर पहिल्यांदाच कोटीचा टप्पा पार केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *