मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर

दि.१९/०१/२०२३

रवींद्र खुडे : विभागीय संपादक

शिरूर : पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेले युवा नेते व पैलवान म्हणूनही ओळख असलेले, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एके काळचे मोठे नेते म्हणजे प्रदेश उपाध्यक्ष व शिक्रापूर ग्रामपंचायतच्या राजकारणातील एक प्रमुख नेते, पैलवान मंगलदास उर्फ आप्पा बांदल, हे दीड वर्षांपासून जेलमध्ये होते. त्यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक झालेली होती. परंतु १८ जानेवारी २०२३ या तारखेला कोर्टाच्या सुनावणीत त्यांना बेल (जामीन) मंजूर झाल्याचे त्यांचे वकील आदित्य सासवडे व पैल. बांदल यांच्या नातेवाईकांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले. परंतु लेखी आदेश निघेपर्यंत त्यांना तुर्तास तरी जेलमध्येच राहावे लागणार असल्याचे सांगितले जातेय. त्यांच्या सोबत अटक झालेल्या साथीदारांनाही बेल (जामीन) मंजूर झाल्याचे ॲड सासवडे यांनी सांगितले. पैल. आप्पा बांदल यांची जेलमधून सुटका होणार हे समजताच त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

शिक्रापूर पोलिसांनी एका प्रकरणात पैल. आप्पा बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यावर २६ मे २०२१ रोजी त्यांना अटक केलेली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत गेले व त्यांचा जेलमधील मुक्कामही वाढतच गेलेला होता. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांच्यावरही गुन्हा दाखल होता, परंतु त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.

शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता. शिवाजीराव भोसले बँकेला अडीच कोटी रुपयांना फसविले असा गुन्हा दाखल झालेला होता. त्या दरम्यान बांदल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले होते. त्या सर्व प्रकरणांमध्ये काही प्रकरणांमध्ये त्यांना या आधीच जमीन मजूर झाले होते तर उरलेल्या प्रकरणांमध्ये बांदल यांना आता जामीन मंजूर झाल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

त्यामुळे २६ मे २०२२ रोजी अटक होऊन जेलमध्ये गेलेले पैलवान बांदल हे तब्बल वीस महिने पूर्ण होत असताना जेलमधून बाहेर येण्याच्या वाटेवर आहेत.
पैलवान आप्पा बांदल यांच्या वतीने उच्य न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड अशोक मुंदर्गी, ॲड आबाद पोंडा, ॲड अनिकेत उज्वल निकम, ॲड तपन थत्ते व ॲड आदित्य सासवडे यांनी काम पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *