ब्रेकिंग – पै मंगलदास बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी केली अटक..

बातमी – विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर –
दि. 26/05/2021

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पै. मंगलदास बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी आज दि. 26/05/2021 रोजी दुपारी 5.15 वा. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथून अटक केली आहे. शिक्रापूर येथील एका जुन्या प्रकरणात फसवणुकीच्या गुन्ह्याखाली बांदल यांना अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

नुकतेच सणसवाडी येथील एका माजी सैनिकाच्या शेतातील विहिरीतून पाणी उपसून नेऊन जमिनीचे नुकसान केले, या तक्रारीवरून बांदल व त्यांच्या भावाला अटक केली होती. त्या प्रकरणात बांदल यांना कालच जामीन मंजूर झाला होता. आणि आज त्यांना शिक्रापूर पोलिसांनी दुसऱ्या एका प्रकरणात तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशन येथून अटक केली असून, पोलीसांनी कमालिची गुप्तता बाळगलेली असून, नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक केलीय ही माहिती बांदल यांच्या कुटुंबियांनाही नाही. बांदल यांचा मित्रपरिवार व कुटुंबिय शिरूर येथे आले असता, त्यांना प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना या अटकेबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे त्यांच्या बंधूंनी पत्रकारांना सांगितले. तर याबाबत शिक्रापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, त्यांनी गोपनीयता बाळगत याबाबत नंतर सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.