काँग्रेसला 2047 पर्यंत ‘अच्छे दिन’ नाहीत ?

दि. १९/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विशेष म्हणजे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. काँग्रेसचं डुबतं जहाज असून एक दिल के टुकडे हुए हजार अशीच अवस्था असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नाशिकमध्ये तांबे पिता-पुत्रांनी ऐनवेळी निर्णय बदलल्याने काँग्रेस तोंडाघशी पडली. तर नागपुरात तीन उमेदवारांपैकी महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून संभ्रम कायम आहे.काँग्रेसमध्ये बुथ लेव्हलपर्यंत कोणी काम करायला तयार नाही. नेतृत्व नाही म्हणून कार्यकर्ते अस्वस्थ आहे. 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाला काही चांगले दिवस नाही. हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजलं आहे. त्यामुळे 30-30 वर्ष आता काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य खर्ची घालायचं नाहीये. तिथे गेल्यावर आजही तिच परिस्थिती आहे. नेत्याचा मुलगा आमदार खासदाराचा खासदार ही काँग्रेसची परिस्थिती आहे. अजूनही नेते आपल्या मुलांना प्रमोट करायला कामाला लागले आहेत.त्यामुळे कार्यकर्ते अस्तित्वात नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळेनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलीये. भाजपकडून इतर पक्षांना सतत डीवचल जातय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कडून काय प्रत्युत्तर येणार हे पाहण महत्त्वाच ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *