‘झाडे वाचवा’, ‘सायकल चालवा; प्रदूषण टाळा’ हा संदेश देत १८ युवकांनी केली निगडी ते गेटवे ऑफ इंडिया सायकल नाईट राईड

दि. १८/०१/२०२३
पिंपरी

 

पिंपरी : ‘झाडे वाचवा’, ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा’! हा संदेश बरोबर घेत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील युवकांनी भक्ती-शक्ती (निगडी) ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर नाईट राईड करत दहा तासात पार केले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील तीन चार युवकांनी एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या सायक्लोहोलिक नावाच्या सायकलींग ग्रुपला सुरुवात केली कोरोना काळानंतर सायकलिंग आणि व्यायामाचे महत्त्व समजलेल्या अनेक युवकांनी हा समूह हळूहळू मोठा होत गेला. या ग्रुप मधील सर्व सदस्य रोज साधारण वीस ते तीस किलोमीटर अंतर सायकलिंग करतात आणि आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी लांब अंतरच्या सायकल राईड चे नियोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन झाडे लावा झाडे वाचवा, सायकल चालवा प्रदूषण टाळा, हा संदेश घेऊन फिरत असतात.

हाच संदेश घेऊन या ग्रुप मधील १८ सायकलिस्टनी १४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता चिंचवड गाव येथील सायकल अपघातात पाय गमावलेले पण अजूनही सायकलिंगचा प्रचार करणारे, सायकलिस्टला सतत प्रोत्साहन देणारे संदिप कुलकर्णी ह्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन भक्ती-शक्ती (निगडी) येथून निघून गेटवे ऑफ इंडिया येथे १५ तारखेला पहाटे पोहोचले. जाताना कामशेतचा घाट, खोपोली मध्ये उतरताना लागणारा बोर घाटचा तीव्र उतार, खोपली ते पनवेल संपुर्ण अंधारात अतिशय सुरेख टीमवर्कने लीलया पार केला.

ही संपुर्ण राईड यशस्वी पार करण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील ज्ञानेश पवार, संतोष हिंगाणे, कपिल आढाव, राहुल गायकवाड, भूषण धाडवे, संतोष दिवेकर, प्रदीप शिरसाट, तपन कुमार, अभिजीत गुजर, श्रीकांत जगताप, गणेश चिने, कुलदीप चौगुले, सुनिल झिरमिले, सचिन भोसले, विशाल नाईक, विक्रम कदम, अविनाश बेळगावकर, सचिन निफाडकर ह्या सर्व सायलिस्टने विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *