खासदार राहुल शेवाळे यांची विघ्नहर देवस्थानला सदिच्छा भेट

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
१५ नोव्हेंबर २०२१

ओझर


दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री राहुलजी शेवाळे यांनी सहकुटुंब सहपरिवार श्री विघ्नहराचे दर्शन घेतले . यावेळी खासदार साहेबांचा श्री विघ्नहरा चरणी अभिषेक करण्यात आला.श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्री. गणेशभाऊ कवडे यांच्या हस्ते खासदार साहेबांचा सत्कार करण्यात आला.श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या महाप्रसाद योजनेअंतर्गत सुरु असलेल्या महाप्रसादालयामध्ये खासदार शेवाळे व कुटुंबीयांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.उत्कृष्ट व दर्जेदार प्रतिचा महाप्रसाद असल्याचे खासदारांनी सांगितले व याच दिवशी खासदार साहेब यांचे चिरंजीव कु.स्वयंम राहुल शेवाळे यांचा वाढदिवस असल्याने मुलाच्या वाढदिवसानिम्मित रक्कम रुपये २१०००/- रोख देवून अन्नदान महाप्रसाद योजेनेमध्ये सहभागी झाले.

खासदार राहुल शेवाळे यांची विघ्नहर देवस्थानला सदिच्छा भेट

याप्रसंगी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गणेश कवडे, खजिनदार कैलास घेगडे ,मा.अध्यक्ष श्री बी.व्ही.अण्णा मांडे ,मा. उपाध्यक्ष रंगनाथ रवळे,सचिव आनंदराव मांडे, मंगेश मांडे व ओझर परिसरातील ग्रामस्थ यांची उपस्थिती होती खासदार साहेबांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट भाविकांना देत असलेल्या सोई सुविधांचे कौतुक केले.तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *