भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला

रोहित खर्गे
विभागीय संपादक

मुंबई दि २७ फेब्रुवारी २०२१
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे समजते. यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply