माजी विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतले ओझरच्या विघ्नहराचे दर्शन

दि. १४/०१/२०२३

प्रतिनिधी : मंगेश शेळके

ओझर

ओझर : माजी विरोधी पक्षनेते व मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर यांनी ओझर येथील श्री विघ्नहर गणेशाचे दर्शन घेतले व अभिषेक केला.
यावेळी श्री.विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझरचे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व श्रींचा फोटो देऊन स्वागत व सत्कार केला.यावेळी दरेकर यांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टची चाललेली विकास कामे पाहून विघ्नहर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व संपूर्ण देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थ यांचे कौतुक केले. तसेच विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या चाललेल्या विकास कामांबाबत देवस्थानचे अध्यक्ष व सर्व अधिकारी वर्ग यांच्याबरोबर सखोल अशी चर्चा केली.

ह्यावेळी आमदार दरेकर यांच्या समवेत मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे हे देखील उपस्थित होते. त्यांचाही देवस्थान ट्रस्टर्फे यथोचित मानसन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *