भिवंडीत भाजपचा दबदबा, १४ पैकी ८ सरपंच भाजपाचे

२० डिसेंबर २०२२


राज्यात १८ डिसेंबरला ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल हाती येत आहे. भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतीत १४ पैकी ८ सरपंच भाजपाचे निवडून आले असून चार ठिकाणी शिंदे गटाने बाजी मारली आहे. तर ठाकरे गटाला अवघ्या एका सरपंच पदावर समाधान मानावे लागले आहे.

यासोबत कोपर, कारीवली, कांबे, दुगाड, आमणे, आवळा-विश्वगड, सापे या ठिकाणी भाजपाने यश मिळविले आहे. तर कशेळी, खानिवली, कासणे, खालींग या ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने विजय संपादन केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *