खेड पोलीस ठाणे यांनी गुरुवारी आयोजित तक्रार निवारण दिनास उपस्थित राहण्याचे आवाहन…

राजगुरूनगर दि ७ सप्टेंबर २१

प्रतिनिधी -अक्षता कान्हूरकर

राजगुरुनगर (खेड) पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गुरुवार दिनांक 9/9/2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून तक्रारदार यांच्या तक्रारीचे ताबडतोब निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन यांना आदेश दिले आहेत.

त्याप्रमाणे खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल फोनवरून फोन करून तसेच मेसेज करून माहिती देण्यात आलेली आहे. संबंधित तक्रारदार यांनी गुरुवारी दिनांक 9/9 /2021 रोजी सकाळी साडेदहा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालयात न चुकता उपस्थित राहावे. सदर तक्रार निवारण दिनास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते व अन्य वरिष्ठ अधिकारी देखील भेट देणार आहेत. खेड पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी बीट अंमलदार व इतर कर्मचारी या तक्रार निवारण दिनास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीचे त्याच दिवशी जागच्याजागी निराकरण केले जाणार आहे .

जास्तीत जास्त तक्रारदार यांनी त्यादिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा, असे आवाहन *खेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव* यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *