अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन, आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटले. यावेळी त्यांनी सत्तार यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले.

यावेळी राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, रुपेश खांडके उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *