दीपावली खरेदीला आले उधाण बाजारपेठा गर्दीने फुलल्या

पिंपरी प्रतिनिधी
१७ ऑक्टोबर २०२२


दिवाळीचा सण आता आठवडाभरावर येऊन ठेपला आहे . त्यामुळे बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठेसह शहरातील प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. विकेंडचे औचित्य साधून नागरिकांनी खरेदी करण्याची संधी साधली. बाजारपेठांत गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी देखील झाली होती.

बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण शहरातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेसह रिअल इस्टेट , सराफ बाजारात दसऱ्यापासून उत्साहाचे वातावरण आहे . दिवाळीसाठीही या क्षेत्रांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत . मोबाईलसह एलईडी टीव्ही , फ्रीज , वॉशिंग मशीन आदी वस्तूंची मोठी रेंज इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत उपलब्ध आहे . ऑटोमोबाईल क्षेत्रातही बुकींगला मोठा प्रतिसाद मिळतो आहे . दिवाळीलाही ई – बाईक्सचा ट्रेंड राहण्याची शक्यता आहे . रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजीचे वातावरण आहे . अनेक नवे गृहप्रकल्प शहर आणि परिसरात साकारत आहे . विविध बँकांनी त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे . विविध शोरूम्सनी दिवाळी खरेदीसाठी ऑफर्सचा खजीना खुला केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *