शासकीय व निमशासकीय दिव्यांग कर्मचार्यांना पुणे मनपा व प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने मोफत लसीकरण…

मंगेश शेळके : ओझर प्रतिनिधी

दि. २६ जून २०२१ ( ओझर ) : पुणे महानगर पालिका व प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर , प्रहार दिव्यांग शासकीय व निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना ,प्रा फांडेशन , अव्दैत परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक २५ जून २०२१ रोजी श्रीकृष्ण मंदीर , डाॕ. बाबासाहेब आंबेडकर काॕलेज समोर येरवडा येथे येरवडा , विश्रांतवाडी व त्या विभागातील दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधाकरिता कोव्हिड शिल्ड लस देऊन लसीकरण करण्यात आले, ह्या लसीकरण मोहिमेत 106 व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले.


निरामय संस्थेच्या डाॕ. संध्या तन्नेवार , प्रकल्प समन्वयक सुर्पिया घाटविलकर व त्यांच्या टीमने सर्वांचे लसीकरण केले .


सदर प्रसंगी प्रहार कर्मचारी संघटनेचे सुनिल साळवी , नासीर शेख , प्रा फांडेशनच्या संचालिका प्राजक्ता कोळपकर , अव्दैत परिवारचे संतोष डिंबळे , रुपा जाधव , अपना घर सामाजिक ट्रस्टच्या प्रणिता राठी, शिवसेना कार्यक्रर्ते भूषण जाधव , सामाजिक कार्यक्रर्ते विलास लोंढे , ज्ञानेश्वर मोझे , श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे बाळासाहेब विश्वासराव ,लायनेस कल्बच्या भाग्यश्री मोरे , रुग्ण सेवक नयन पुजारी संतोष अभंग , प्रहार अपंग क्रांती संस्थेचे रफीक पठाण , सुनंदा बामणे , लता दहिरे , रंजना गाढवे , माऊली वाघमारे , सचिन करंबळेकर , संजय बनपट्टे , दिपक दाने , र्पितम जगताप , सुधीर केंपनार इ. उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *