अवैध जुगार तसेच दारू धंदयावर घोडेगाव पोलिसांचे धाडसत्र सूरूच…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्टयातील शिनोली, सुपेधर ,आंबेगाव गावठाण पोस्ट बोरघर नंतर गुरुवार  दि.१ जुलै रोजी चास , इंदिरानगर , आंबेगाव गावठाण  या दोन जागी घोडेगावचे नवनियुक्त साहाय्यक पोलिस निरिक्षक लहु थाटे यांनी छापे टाकत अवैध धंदे वाल्यांवर धाडसत्र सुरुच ठेवल्याने, अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे घोडेगाव पोलिसांच्या या बेधडक कारवाईचे घोडेगाव व पंचक्रोशीतील नागरिक  कौतुक करत आहे.

पाहिली घटना चास ता. आंबेगाव येथील इंदिरानगर येथे १ जुलै रोजी साय.५ च्या सुमारास आरोपी खंडु फकीर सोनवणे वय 50 वर्षे याने त्याच्या घरामागे आडोशाला ,बिगर परवाना सुमारे १०८०/- रुपयांची देशी दारू बाळगून त्याचे ओऴखीचे लोकांना चोरुन विक्री करत असताना  मिऴुन आला  असल्याचे पोलिसांना आढळले. त्यावेळी त्याच्याजवळ असणारा अवैध दारूसाठा जप्त करून त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची फिर्याद घोडेगावचे सहायक पोलीस फौजदार कोंडाजी दामोदर रेंगडे यांनी दिली आहे.
दुसरी घटना  आंबेगाव गावठाण. ता आंबेगाव येथिल गणेश होनाजी आसवले यांच्या राहते घराचे शेजारी रामचंद्र हेमा उंडे यांचे चालु असलेल्या नविन बांधकामाचे पहिल्या मजल्यावर पहिल्या रुममध्ये १ जुलै रोजी रात्री ८ : ३० च्या सुमारास युवराज बबन तरडे आणि महेश महादेव पवार दोघेही राहणार आंबेगाव गावठाण हे पैसे लावून तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांना घटनास्थळी सुमारे ३२५०/- रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य आढळले.

Advertise

जुगार खेळणाऱ्या दोन्ही इसमांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ च्या कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतही घोडेगावचे सहायक पोलीस फौजदार रेंगाडे यांनीच फिर्याद दिली असून ती ठाणे अंमलदार एम. एच. तुरे यांनी नोंदवून घेतली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास घोडेगावचे नवनियुक्त दंबग सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा एम.एम झनकर, साह. फौजदार  एन. एम. वायाऴ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *