पिंपरी कॅम्पमध्ये पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादी

दि. १२/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज गुरुवारी पिंपरीतील कॅम्प परिसरात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली असता अतिक्रमणविरोधी पथक व व्यापारी यांच्यामध्ये काही कारणास्तव जोरदार वादावादी झाली. दुकाने बंद करून सर्व व्यापाऱ्यांनी या कारवाईचा निषेध केला. शगुन चौकात एकत्र येत सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी तेथून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पायी जात निषेध मोर्चा काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *