निर्बिजीकरणानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढते? मारुती भापकर यांचा आयुक्तांना सवाल

दि. ०७/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका देत असते. या कामावर महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तरीही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सतत वाढत आहे ती कशी? असा सवाल माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केला आहे.

भापकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वर्षानुवर्ष पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढुन मोकाट कुत्र्यांना पकडुन त्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामाचा ठेका देण्यात येतो. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र कुत्र्यांची संख्या निर्बिजीकरणानंतरही नियंत्रणात येण्याऐवजी ती कशी वाढत आहे.

निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड वावर ऐन मध्यरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड होते. दिवसा हे कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर धावतात त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *