पारगाव येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे अभ्यास सहलीचे आयोजन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२० डिसेंबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी.काळे महाविद्यालयातील विज्ञानशाखेतील केमिस्ट्री विभागाच्या वतीने नुकतीच भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथे अभ्यास सहल संपन्न झाली. कारखान्यातील कामकाजाचे स्वरूप व साखर प्रक्रिया याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन श्री.आदेश थोरात, श्री.संदेश इंगवले,श्री.टेमकर साहेब इ.नी केले.या सहलीत ३८ विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले होते.या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.बी.जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.विश्वास कोकणे, प्रा.अमोल दप्तरे,प्रा.सोनाली घोडेकर,प्रा.राजश्री फलके इ.नी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *