मंगेश शेळके : ओझर प्रतिनिधी
दि. १६ मे २०२१
ओझर : धालेवाडी तर्फे हवेलीचा खरा कोरोना योद्धा गावचे उपसरपंच सुभाष भाऊ दळवी गेल्यावर्षी कोरोना ची पहिली लाट आली गावातील काही ग्रामस्थ पॉझिटिव्ह आल्याची बातमी समजल्यानंतर गावातील कोणतीच व्यक्ती त्या कुटुंबाच्या जवळ जात नव्हती परंतु सुभाष भाऊंनी आपल्या घराची व स्वतःची काळजी न करता सर्वात प्रथम त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जायचे असेल किंवा त्या परिवाराची मदत करायची असेल तर सर्वात प्रथम उपसरपंच सुभाष दळवी यांनी केले.
आज पर्यंत गावातील असेल किंव्हा त्यांच्या मित्र परिवारातील कोणत्याही पॉझिटिव्ह पेशंटचे त्याला आपल्या घरातलं समजून ,मग त्याला दवाखान्यात न्यायचे असू वा अन्य कोणती मदत लागो, सर्वप्रथम सर्वात पुढे असतात. त्यामुळेच सुभाष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावकरी व त्यांच्या सहकारी मित्रांनी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्य गावातील ग्रामस्थांसाठी एक हजार सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप , त्याच बरोबर प्रत्येक घरात डेटॉल साबणाचे वाटप , सर्वांना सकस आहार मिळण्यासाठी जवळजवळ दोन हजार अंड्यांचे वाटप केले. त्यामध्ये सॅनिटायझर बाँटल चे वाटप सिव्हिल इंजिनिअर विजय नवले व श्रीमंत ड्रायक्लीन चे मालक अनिकेत भाऊ टेंभेकर यांनी केले.
तसेच बाकीच्या सर्व मित्र परिवाराने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप केले. त्याप्रसंगी किसन पोपट टेंभेकर,अनिकेत टेंभेकर ,विजुभाऊ नवले ,रामभाऊ बोर्हाडे ,अनिल पवार, स्वप्निल बोर्हाडे ,विशाल तामचिकर ,सावन तामचिकर ,मनोहर राऊत ,संजू भाऊ दुधवडे ,बापूसाहेब दहीफळे, गणेश महाराज राऊत ,राहुल फुलमाळी ,नामदेवराव टेंभेकर ,महेंद्र वाघमारे ,अविल टेंभेकर ,वैभव नवले, दीपक बोर्हाडे ,गणेश दत्तात्रय टेंभेकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी साहित्य वाटपात सहभाग घेतला . व सामाजिक बांधिलकी जपत उपसरपंच सुभाष दळवी यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.