बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढील वाटचाल करणार – दीपक केसरकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि पक्षचिन्ह सुचवण्यास सांगितले. दिवसभर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अखेर निर्णय झाला आहे. यानुसार ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे पक्षाचं नाव, तर ‘मशाल’ हे पक्षचिन्ह मंजूर झालं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ हे पक्षाचं नाव दिलं आहे.

‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढील वाटचाल करणार आहोत. हिंदूत्वाचा विचार घेऊनच आम्ही काम करणार असून चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे मंगळवारी पर्याय दिले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच अंतिमत: धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *