लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे निवेदन, अहमदनगर मातंग समाज पंचकमिटी व समस्त मातंग समाजाच्या वतीने शासनास सादर

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे.
दि. 28/07/2021

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांची शतकोत्तर पहिली जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याच्या सूचना करण्याबाबतचे निवेदन, अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंच कमिटी व समस्त मातंग समाजाच्या वतीने, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी, पंचकमिटीचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे, युवा अध्यक्ष उमेश साठे, कार्याध्यक्ष मधुकर पठारे, भगवान गोरखे, पोपट साठे, दिनकर सकट, डी. जी. साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचे कळविलेले आहे. एका पाहणीनुसार काही कार्यालयांमध्ये याची अंमलबजावणी होत नसून, अनेक कार्यालये सदर जयंती साजरी करण्यास उदासीनता दाखवीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी यासाठीची आठवण म्हणून हे निवेदन देण्यात आलेय. याची अंमलबजावणी न करणार्‍या कार्यालये व त्यांच्या प्रमुखांवर, योग्य ती कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *