शिंदे-ठाकरे येणार आमने-सामने!; ठाकरे शिंदेंशी संवाद साधणार का ?

दि. ०७/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे तिन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच मंचावर येतील.त्यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? ते एकमेकांशी संवाद साधतील का? या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून शिंदेसोबत आलेला दुरावा दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे टाकणार का? या सगळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 23 जानेवारी हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाले. बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच घमासान युद्ध सुरू झालं. त्यामुळं ठाकरे-शिंदे यांच्या एकाच कार्यक्रमातील भेटीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *