लोहगड परिसरात जमावबंदी आदेश जारी

दि. ०५/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : मावळ तालुक्यातील लोहगडावर असलेल्या हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरूस उद्या शुक्रवार आणि शनिवारी होणार असून हा उरूस साजरा करण्यास गडावर उरूस साजराला करण्यास पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली आहे. मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी सार्वजनिक शांतताभंग आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून लोहगड घेरेवाडी परिसरात ८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

लोहगडावर उरूस साजरा करण्यास काही हिंदुत्ववादी संघटनानी विरोध दर्शविला असून त्यांनी लोहगडावरील दर्गा व मजारी यांचा कोणताही ऐतिहासीक पुरावा नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडावरील अनाधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले गेले त्याप्रमाणे लोहगडावरील अनधिकृत बांधकाम काढावे, ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी उरूसाचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोहगडावर उरूस होवू दिला जाणार नाही. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा उरूस होऊ देणार नाही याप्रसंगी मोठे जनआंदोलन अथवा मोर्चा उभारू असा इशारा दिला आहे.या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिल्याचे पत्र हिंदुत्ववादी संघटनांनी मावळ तहसीलदार यांना दिले आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतताभंग होण्याची शक्यता वाटल्याने या कालावधीत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *