क्षत्रिय हिंदू हृदय सम्राट स्व.सुखदेवसिंह गोगामेडी शेखावत यांना असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत निगडित श्रद्धांजली

हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन अखंड भारतभर राजपूत समाज व हिंदुत्वासाठी आपलं जीवन अर्पण करणारे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.शुखदेवसिंह शेखावत गोगामेडी यांच्या वर त्यांच्या राहत्या घरी प्राणघातक हल्ला करून गोळ्या झाडण्यात आल्या व त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा या व अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येत महाराणा प्रतापसिंह उद्यान निगडी येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी,राजपूत समाज संगठन चे सचिव तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राणा अशोकभाऊ इंगळे,मार्गदर्शक अशोकसिंह परदेशी,किरण परदेशी,नारायण चंदेल,राणा मुकेश राजपूत,गणेश राजपूत,रूपेश राजपूत विनोद जाधव, जितेंद्र राजपूत तसेच मोशी,चिखली,जाधववाडी,मोरेवस्ती,दिघी,नर्हे,वारजे,चाकण, डुडुळगाव,भोसरी, तळेगाव,प्रतिशिर्डी शिरगाव,रुपीनगर व पुणे जिल्ह्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

श्रद्धांजली अर्पण करताना समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणे व खंबीर पने उभे राहणे हेच राजपूत समाजाचे कार्य आहे असे आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी बोलतांना मत व्यक्त केले.विखुरलेला समाज हा एका छताखाली या निमित्ताने एकत्र यावा असे उदगार मा.सचिव श्रीराम परदेशी,विध्यमान सचिव राणा अशोक इंगळे व राणा मुकेश राजपूत यांनी काढले….

कार्यक्रमाचे नियोजन हे संघटनेचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक यांच्या सहभागाने यशस्वी पार पडले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *