राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मध्ये कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार डॉ.सौ.अलका नाईक यांना प्रदान

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२४ फेब्रुवारी २०२२

ओझर


डॉक्टर सौ. अलका नाईक मॅडम या प्राध्यापिका, प्रशासिका पत्रकार,लेखिका, कवयित्री समाजसेविका व कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत.यांचे मुळचे गाव जैतापूर असून त्यांचे प्राथमिक,माध्यमिक व कॉलेज शिक्षण मुंबई येथे झाले.त्यांनी अतिशय उच्च शिक्षण घेतले असून ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए, एम. कॉम, एम. एस,पी. एच. डी. अशा अनेक पदव्याही प्राप्त केल्या आहेत.एम. पी. एस. सी. पास होऊन सचिवालयात मिळालेली मानाची नोकरी सोडून त्यांनी शिक्षकी पेशात आपली कारकीर्द गाजवली. प्राचार्य आणि प्रशासक म्हणूनही उत्तम कार्य केले. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी १० वर्षे प्रशासिका,कॉर्डिनेटर मॉडरेटर ,कौन्सिलर इ. अनेक पदांवर कार्यरत राहून गौरवास्पद कार्य केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्या गरजूंना मोफत मार्गदर्शन व सल्लाही देतात .वृद्धाश्रम ,असोसिएशन ऑफ ब्लाइंड, कॅन्सर पेशंट इ.साठी त्या कार्यरत आहेत .त्यांना जीवनात ७५ पेक्षा जास्त उच्चतम पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी अनेक विविध पदे भूषविली आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सेमिनार वेबिनार यामध्ये संशोधन प्रसिद्ध केले आहे. कॅनडा टीव्हीवर तीन वेळा त्यांची संदेशपर मुलाखत झाली आहे, अनेक संस्थांच्या त्या सभासदही आहेत.

नेपाळ श्रीलंका इंडोनेशिया मलेशिया इत्यादी देशांमध्ये विश्व साहित्य संमेलनात सहभागी होऊन अनेक काव्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांचा ‘शब्दगंध ‘हा कवितासंग्रह व ‘मधुगंध ‘ हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे. अनेक मासिकांमध्ये लेख लिहिले आहेत, तसेच विविध कविता संग्रहांमधून त्यांच्या कविता झळकतात. त्यांनी कैलास मानसरोवर यात्राही पूर्ण केलीआहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी सुवर्णपदक प्राप्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार,दिल्ली येथे मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार, अमरावती,हिरकणी पुरस्कार, राष्ट्रीय श्रेष्ठ शिक्षक पुरस्कार-इंदोर, केशदान, अवयवदान या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सध्या सैनिक भारती ह्युमॅनिटी फाउंडेशन व महिला टॅक्सीचालक संघटना इत्यादीसाठी काम चालू आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ याच्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ,पुणे याच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षा आहेत., तेजस्विनी सल्लागार, प्रितगंधफाउंडेशन सल्लागार तसेच महिला सक्षमीकरणासाठी त्या सदैव कार्यरत आहेत.

तेजस्विनी झेप महिला उद्योजिका संस्था पुणे, यांच्या सल्लागार,जैतापूर महिला प्रबोधिनी संस्था याच्या संस्थापकआहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व मार्गदर्शन आणि समुपदेशन केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण कोकणामध्ये दौरे करून सातत्याने करतात. त्यांनी अनेक वाचनालयांसाठी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. तसेच चिपळूणच्या, महाडच्या पूरग्रस्तांनाही केली मदत केली. अलीकडेच त्यांना बेस्ट ह्यूमेनिटेरियन अवॉर्ड कोरोना योद्धा अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे…सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर अलका नाईक यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मध्ये प्रदान करण्यात आलेला कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार हा त्यांच्या या कार्याचा उचित गौरव असून सर्वत्र त्यांचे कौतुक व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *