विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले शालेय साहित्याचे वाटप.

जुन्नर तालुक्यामधील उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील मांडवे (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण ४० विद्यार्थ्यांना बुट ,वही,पेन,टूथब्रश, या शालेय वस्तूंचे वाटप ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्यामार्फत करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यापूर्वी कांडगे यांनी ऐन उन्हाळ्यात या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला त्यावेळी स्वतः पाण्याचे टँकर घेऊन कोपरे,मांडवे

मुथाळणे,याआदिवासी बांधवांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला होता.कांडगे हे या आदिवासी भागातील सामाजिक कार्य करणारे आतापर्यंतचे पहिलेच पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या या उदात्त विचारसरणीमुळे आदिवासी भागातील लोक त्यांना खाकी वर्दी मधील दर्दी माणूस मानतात.
या कार्यक्रम प्रसंगी कांडगे यांनी उपस्थित विध्यार्थी यांना शिक्षणाबाबत स्वतःची स्वछता कशी ठेवावी या बाबत मार्गदर्शन केले असून पालक तसेच ग्रामस्थ यांना सोशल मीडिया वरील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना कश्या कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले आहे .या वेळी शिक्षक सुनिल चौधरी,सरपंच दामोदर गोडे, पोलीस पाटील बबन दाभाडे,माजी पोलीस पाटील संतू बुधा ठोंगिरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान दाभाडे, ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश दाभाडे तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार महेश पटारे ,लहू लांडे व पोलीस मित्र सूरज पानसरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *