कितीही ताकद लावली तरी शिंदे ठाकरेंना हरवू शकत नाही!; ही आहेत कारणे

दि. ०५/०१/२०२३
मुंबई


मुंबई : काही महिन्यांपूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाला बसत आहेत. यामध्ये सगळ्यात मोठा दणका बसला तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ! एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडून आपला वेगळा गट तयार केला आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. शिवसेनेला तेव्हा लागलेली गळती अजूनही उद्धव ठाकरेंना थांबवता आली नाही. मुग्यांनी साखरेकडे वळावे तसेच आजही ठाकरे गटातील नेते हळूहळू शिंदे गटाकडे चिटकू लागलेत. परंतु, तरीही ठाकरे बिनधास्त आहेत. ‘जाणाऱ्याला दार आहे येणाऱ्याला घर आहे’ अशी भूमिका त्यांनी यावेळी ठेवलीय. कहर म्हणजे ज्याला शिंदे गटात जायच आहे त्याने पक्षाच्या बाहेर जायच्या आधीच ठाकरे त्यांची हकालपट्टी करतात. दरम्यान, पक्ष अक्षरशः मोडकळीस आला तरी ठाकरे इतके निवांत का ? असा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय.

सध्याच्या काळात ठाकरेंच निवांत राहणं किंवा बेफिकीर वागणं हा त्यांचा पक्ष बांधणीवर असलेला विश्वास म्हंटल तरी वावग ठरणार नाही. शिवसेना हा फक्त पक्ष नसून संघटना आहे. अगदी तळागाळात शिवसेनेच्या शाखा असून पक्षावर विश्वास व निष्ठा असलेले शिवसैनिक ठाकरेंकडे आहेत. इतर पक्षांसाठी त्यांचे आमदार खासदार हीच त्यांची ताकद असते परंतु , शिवसेनेसाठी त्यांचे शिवसैनिक हीच ताकद आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात झालेली तुडुंब गर्दी हा याचा पुरावा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेतील महत्त्वाचे आणि मोठे नेते जरी शिंदे गटात जात असले. तरी ठाकरे गटाकडे 10 ला बराबर एक असा नेता आहे. एकनाथ शिंदेनी गोड बोलून ठाकरेंचे कितीही मासे गळाला लावले तरी ते ठाकरेंना हरवू शकणार नाहीत. कारण शिंदे गटातील नेत्यांपेक्षा जास्त ताकदीचे नेते ठाकरे गटाकडे आहेत.

शिंदे ठाकरेंना हरवू शकत नसल्याचं आणखी एक कारण म्हणजे ठाकरेंना मित्रपक्षाचा असलेला पाठिंबा ! शिंदेंनी भाजपाचे बोट धरून युती करत राज्यात सरकार स्थापन केले परंतु, आता भाजपाच शिंदेंना बाजूला करण्याच्या तयारीत आहे. या तुलनेत उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी व काँग्रेसचा खंबीर पाठिंबा आहे.

राजकारणात कितीही तोडाफोडी केली तरी जिंकण्यासाठी लागते ती हुशारी.अशी हुशारी ठाकरेंकडे आहे. याच उदाहरण म्हणजे शिंदेंनी उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे 13 आजी माजी नगरसेवक फोडले. इतकच नाही तर संजय राऊत यांचे विश्वासू भाऊ चौधरी यांना देखील आपल्या जवळ केले. परंतु उद्धव ठाकरेंनी उत्तर महाराष्ट्रात शिंदेंना शह देण्यासाठी तगडा प्लॅन आखलाय. यामध्ये त्यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आजी-माजी नगरसेवकांच्या प्रभागात जाऊन मेळावे घेण्याचे नियोजन केले आहे. शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल मेळावे घेणार असून यामुळे शिवसैनिक ठाकरेंच्या आणखी जवळ येणार आहेत.

शिंदे नेहमी वरच्या फळीतील मोठ्या- मोठ्या नेत्यांना घोळात घेण्याचा प्रयत्न करतात परंतु उद्धव ठाकरे तळागाळातील लोकांच्यात व शिवसैनिकांत आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे नेत्यांशी खेळतात ठाकरे थेट लोकांशी हात धरतात. यामुळेच शिंदेपेक्षा ठाकरेंची सरशी होते. परिणामतः एकनाथ शिंदेंनी कितीही उड्या मारल्या तरी एकवेळ त्यांच्या पायावर ताण येईल पण त्यांना ठाकरेंना हरवणे जमणार नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *