तो मी नव्हेच असे म्हणणाऱ्या अनिल परब यांची जेलमध्ये जाण्यापासून सुटका नाही : किरीट सोमय्या

दि. ०५/०१/२०२३

मुंबई


मुंबई : राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि आमदार अनिल परब यांची कोकणातील मुरूड येथील १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

या संदर्भात परबांनी या मालमत्तेशी आपला काही संबंध नाही. ही मालमत्ता सदानंद कदम यांची आहे. ईडीने या गोष्टी तपासलेल्या आहेत. त्यांची कारवाई चूक की बरोबर हे न्यायालय ठरवेल. मी न्यायालयात जाऊन न्याय मागेन. मला राजकीयदृष्ट्या बदनाम केले जाते आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, किरीट सोमय्यांनी ‘या ॲक्टिंगसाठी महान कलाकार असा पुरस्कार परबांना देण्यात यावा. तो मी नव्हेच असे म्हणणाऱ्या अनिल परब यांची जेलमध्ये जाण्यापासून सुटका नाही.’ असा टोला परब यांना हाणला आहे.

तर ईडीच्या म्हणण्यानुसार महसूल खात्याकडून अवैधरीत्या परवानगी घेत तेथील भूखंडावर तळ मजला एक असे दोन बंगले परब यांनी बांधले. या प्रकरणात आपले नाव येऊ नये याकरिता कागदोपत्री मूळ मालकाचे नाव परब यांनी कायम ठेवले होते आणि बांधकामासाठी अर्ज करताना मूळ मालकाची बनावट स्वाक्षरी केली होती. ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतेववेळी ही जागा सीआरझेड-३ मध्ये येत असल्याची बाब लपविली. याप्रकरणी आर्थिक व्यवहार रोखीने करण्यात आले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर परब यांनी केवळ कागदोपत्री ही जमीन सदानंद कदम यांच्या नावे केली होती. दरम्यान अनिल परब यांनी याबाबत आपला खुलासा केलेला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *