स्पोर्टस बाईकने धडक दिल्याने नातू, आजोबांचा मृत्यू

दि. ०५/०१/२०२३

पुणे


पुणे : पुणे पंढरपूर मार्गावरील दिवे, तालुका पुरंदर ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या दुचाकीला अतिवेगाने जाणाऱ्या स्पोर्टस बाईकने धडक दिल्याने ४ वर्षाच्या बालकासह त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी स्पोर्टस बाईक पेटवून दिली. हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे.

गोकुळ धोंडीबा झेंडे (वय-६३) आणि पद्मनाभ झेंडे (वय-४) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर दुचाकीस्वार यशवर्धन मगदूम याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ झेंडे हे नातू पद्मनाभ याला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, त्यांची दुचाकी पुणे-पंढरपूर मार्गावरील सासवड रस्त्यावर दिवे ग्रामपंचायत हद्दीत त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एका दुचाकीने (क्रमांक एम.एच.१२ यु.एक्स.६०५५) जोरात धडक दिली. या अपघातात झेंडे यांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर झेंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *