ठाकरे गटाच्या 30 महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.  ठाकरे गटाच्या भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी या पदाधिका-यांचे स्वागत केले.

थेरगाव येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,  जिल्हाप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस,  शहर संघटिका सरिता साने,  उपजिल्हा संघटिका शैला पाचपुते, मावळचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे,  युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे,  युवासेना उपशहरप्रमुख माऊली जगताप, राजेंद्र तरस, अंकुश कोळेकर, सय्यद पटेल, महेश कलाल, हेमचंद्र जावळे  हे पदाधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, युवा सेनेचे माऊली जगताप यांच्या प्रयत्नातून भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे, शुभांगी सपकाळ, मनीषा पवार, दीपा जोगदंड, प्रगती चौरे, कांचन जगदाळे, अलका भोसले, रूपाली भोसले, दिपाली घाडगे यांच्यासह इतर महिलांनी व शिवसेना विभागप्रमुख संदीप येळवंडे, आशिष सोनवणे, प्रतीक इंगळे, नवनाथ जगदाळे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

 खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेची शहरात ताकद वाढत आहे. पदाधिका-यांनी संघटना बळकट करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महत्वाचे निर्णय घेत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि जिझिया कर असलेला शास्तीकर आपल्या सरकारने रद्द केला आहे. शहरवासीयांना शास्तीकरातून मुक्त केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाण्याचा प्रश्नही निकाली निघेल. आंद्रा धरणातून  लवकरच वाढीव पाणी शहरवासीयांना मिळेल. शहरातील प्रलंबित प्रश्न शासन सोडवत. शिंदे-फडणवीस सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सरकारचे हे सर्व निर्णय सर्वसामान्यपर्यंत पोहचवावेत. योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्यावा” असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *