योगी आदित्यनाथ यांनी गुजराथमध्येही जावे; खासदार संजय राऊत यांचा उपरोधिक सल्ला

दि. ०४/०१/२०२३
मुंबई


मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गजांशी चर्चा करणार आहेत योगी यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतच नव्हे तर गुजराथलाही गेले पाहिजे; असा खोचक सल्ला राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. मुंबई ही उद्योग नगरी आहे. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या विकासासाठी चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये येत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मागे सुद्धा योगी आदित्यनाथ आले होते, त्यांनी यूपीमध्ये फिल्मसिटी काढण्याची घोषणा केली होती. योगी आदित्यनाथ यांनी गुजरातला सुद्धा गेले पाहिजे. कारण, मुंबईचे औद्योगिक नियंत्रण समितीचे कार्यालय हे गुजरातला हलवले आहे. तिथे जाऊन सुद्धा त्यांचा फायदा होईल अशी मार्मिक टिप्पणीही खासदार राऊत यांनी या विषयी बोलताना केली.

उत्तर प्रदेशमधील लाखो लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात. महाराष्ट्राने आतापर्यंत अनेकांना मोठे केले आहे सामावून घेतले आहे. असे असताना महाराष्ट्रातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळवून नेले जात असतील तर त्याला महाराष्ट्राचा विरोधच असेल. महाराष्ट्र विरोध केल्याशिवाय राहणार नाही; असा इशारा देखील खासदार राऊत यांनी यावेळी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *