नियमित पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे महापालिकेसमोर आंदोलन

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. शहराला रोज पाणीपुरवठा होण्यासाठी चिखली येथील प्रकल्प सुरू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, विद्या कुलकर्णी, विशाल मानकरी, राजू सावळे, चंद्रकांत बाळा दानवले, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, मयुर चिंचवडे, सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, तुकाराम शिंदे, अमर माळी, नितीन चव्हाण, राजू भालेराव, राजेश अवसरे, श्रद्धा देशमुख, कैलास दुर्गे, नीलेश नेटके, कृष्णा महाजन, सुरेश सकट, विशाल उकिरडे, सोनू भोसले, अॅलेक्स मोझेस, नारायण पठारे, शिशिर महाबळेश्वरकर यांनी भाग घेतला.

शहरात दोन वर्षांहून अधिक काळ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तो पूर्ववत व्हावा या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारी आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अधिकाऱ्यानी आयुक्तांसोबत चर्चा करून चिखली पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करू, असे आश्वासन दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *