वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारीपदी डॉ. प्रवीण निकम

दि. ०२/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : वडगाव मावळ नगरपंचायत मुख्याधिकारीपदी डॉ. प्रवीण निकम यांची नियुक्ती झाली आहे. मार्च महिन्यात यापूर्वीच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. नगरपंचायतीच्य मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

आता डॉ. प्रवीण निकम यांची वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली असून नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डॉ. निकम या आधी अकोले नगरपंचायतीत कार्यरत होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात द्वितीय, तर नाशिक महसूल विभागात प्रथम क्रमांक त्यांच्या कामकाजात मिळाला होता. त्यांच्या कार्यकाळात मैला व्यवस्थापन बनवणारी ही पहिली नगरपंचायत ठरली होती. तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतही ते कार्यरत होते.

आपल्या कार्यकालात वडगाव नगरपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन, विकास आराखडा, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन काम केले जाईल असे डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *