उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय, नितेश राणेंच्या टीकेला रविंद्र वायकर यांचं उत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन म्हणजेच ‘मशाली’ संदर्भात भाष्य केलं. ठाकरेंना मिळालेलं चिन्ह मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला नितेश राणेंनी लागवला. त्यावरच शिवसेनेनी जसेच्या तसे उत्तर दिले आहे.

रविंद्र वायकर यांनी नितेश राणेंच्या टीकेला उत्तर देताना वायकर यांनी, ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं, असा टोला नितेश राणेंना लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *