कोरोना योद्धांचा सन्मान धनत्रयोदशीला आरोग्यविमाची भेट

बातमीदार : रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

चिंचवड : दि १३ नोव्हेंबर, कोरोना महामारीविरुद्ध गेले सात महिने तळागाळात जाऊन स्वच्छता करणाऱ्या व आपल्याला कोरोना पासून दूर ठेऊन स्वतः अहोरात्र कष्ट करणाऱ्या योद्धांचे कौतुक करून आभार व्यक्त करण्याचा सोहळा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पार पडला.

चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विजय शिंदे यांनी कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर सफाई कामगारांना त्यांच्या आरोग्यासाठी विम्याचे संरक्षण देत त्यांचा दिवाळसण खऱ्या अर्थाने आरोग्यदायी बनविला आहे.

प्रभागातील घंटागाडी कर्मचारी व इतर कर्मचारी यांचा रु. १० लाखांचा अपघात विमा रु. ५० हजारांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारणी सदस्य प्रकाशराव मिठभाकरे व हेमंतराव हरहरे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक व जेष्ठ नेते मधुजी जोशी यावेळी उपस्थित होते.

५० ते ६० कोरोना योद्धांना विमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर येणाऱ्या काळात इतर कोरोना योद्धांचाही सन्मान करण्याचा मानस आहे अशी माहिती नगरसेवक विजय शिंदे यांनी दिली.

प्रभागातील नागरीकांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावत योद्धांचा सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *