100 वादग्रस्त मीडिया पोस्ट्सची पोलीस करणार चौकशी

दि. ०२/०१/२०२३
पुणे


पुणे : शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या १०० हून अधिक सोशल मीडिया पोस्ट मिळाल्या आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात आली असून, त्यांनी तातडीने अशा पोस्ट हटविण्याचे आदेश दिले आहेत; अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

ते म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सोशल मीडिया हँडलवर अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात नोटीस बजावली आहे आणि अशा पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास अशा लोकांवर गुन्हा दाखल केला जाईल. सोशल मीडिया आणि मेसेंजर अॅप्सवर कोणतीही खोटी, बदनामीकारक किंवा सांप्रदायिक फूट पाडणारी माहिती किंवा संदेश पाठवल्यास त्याला जबाबदार धरले जाईल आणि असे संदेश पाठवणाऱ्या ग्रुप अॅडमिन आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *