मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेचे खंडोबा मंदिर, आकुर्डि येथे घंटानाद आंदोलन

रोहित खर्गे
विभागीय संपादक

आकुर्डी – दि ६ सप्टेंबर२०२१
कोरोना ची तिसरी लाट येणार अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा कार्यक्रम सरकार पक्षाकडून चालू आहे तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात, जगभरामध्ये आहे. देशांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये अटी शर्ती सह इतर उद्योगांना, धार्मिक स्थळे उघडायचा निर्णय घेतला आहे आणि त्या सगळ्या अटी व शर्तींचे पालन करून धार्मिक भावीक लाभ घेत आहेत.

महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शासनाला हेच सांगितलं की तुम्ही ज्या काही अटी-शर्ती असतील नियमावली असतील त्या आम्हाला द्या आम्ही त्याचं पालन करून हिंदूंचे सण साजरे करू. मग दहीहंडी असेल गणेशोत्सव असेल मंदिरामध्ये उपासना असेल दर्शन असेल, परंतु स्वतःचे राजकीय कार्यक्रम रेटताना ह्या तिन्ही पक्षाला कुठलेही बंधन नाही मग त्यात पंढरपूरची झालेली पोट निवडणूक असो पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन असो काल-परवा झालेला जुन्नर आंबेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये झालेला कार्यक्रम असो किंवा शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भरगच्च मेळावे असो त्या वेळेला कुठेही कोरोना नसतो परंतु हिंदू सणांची ज्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा समोर येते त्या वेळेला मात्र निमित्त करून हे हिंदू लोकांची गळचेपी करायचा कार्यक्रम हे सरकार करते. हा मुद्दा फक्त धार्मिक नाहीये हा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला नियम लावायचे आहेत तर ते सर्वांना लावा आतापर्यंत देशात आणि महाराष्ट्रात जे काही नियम लागलेले आहे ते सरकारने कमी आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे लागलेले आहेत आमची हीच विनंती हे सरकारला की तुम्ही निर्बंध घ्या त्याचं पालन आम्ही करू.

हा मुद्दा फक्त धार्मिक नाहीये हा मुद्दा एवढाच आहे की आम्ही त्या नियमामध्ये दोषी आढळलो तर आम्ही कारवाईस पात्र आहोत तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून तुमच्या लोकांना तुम्ही झुकते माप देणार आणि जे हिंदूंचे पाठीराखे आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यात तर अशा गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सर्व शक्तिनिशी विरोध करेल आजही करते उद्या करेल इथून पुढे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि सचिन चिखले यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल
रूपेश पटेकर,राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितिन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ, राजेश अवसरे, ऋषिकेश जाधव, विपुल काळभोर, के. के. कांबळे, गणेश वाघमारे, शंकर बिराजदार, डी. एम. कोळी, दिनकर सूर्यवंशी

महिला सेना- अश्विनी बांगर(शहराध्यक्ष), सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ,विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, वैशाली बोत्रे, संगीता कोळी, अरुणा मिरजकर

विद्यार्थी सेना – हेमंत डांगे(शहराध्यक्ष), सुमित कलापुरे, विक्रम आढे, सोरटे, कृष्णा काकडे, रोहन कांबळे,

वाहतुक सेना -सुशांत साळवी,शिवकुमार लोखंडे,श्री नितिन सुर्यवंशी, अविनाश तरडे, कृष्णा महाजन,विशाल साळुंखे

मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना – निलेश नन्नवरे, भरत क्षेत्र, मंगेश गायकवाड, ऋषिकेश पाटील

जनहित- राजू भालेराव(शहराध्यक्ष), मिलिंद सोनवणे, शैलेश पाटिल, विजया परदेशी

चित्रपट सेना- दत्ता घुले (शहराध्यक्ष)

तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *