वडगाव कांदळीच्या हिंदमाता उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात कोविड लसीकरण

रामदास सांगळे
विभागीय संपादक
५ जानेवारी २०२२

बेल्हे


हिंदमाता माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय वडगाव कांदळी (ता जुन्नर) येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली. १५ ते १८ वयोगटातील कोणताही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरणानंतर कोणाला त्रास होतो का? पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही काळ देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी येथील आरोग्य सेविका सोनवणे, नितीन निघोट, दिपाली थोरात, ज्योत्स्ना भोर,सुनीता गुंजाळ, रोहिणी पवार उपस्थित होते. वडगाव कांदळी चे सरपंच रामदास पवार, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते, पिरखान पठाण विद्यालयाचे प्राचार्य वाकचौरे जे. एल.,पर्यवेक्षक चौरे एन.एस.उपशिक्षक एस.के जाधव, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *