टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्स ली. कंपनीकडून मलठण गावासाठी अत्याधुनिक ऑक्सिजन अम्ब्युलन्स भेट…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
रांजणगाव : दि. 04/06/2021.

सध्या अवघ्या जगालाच कोरोना या संसर्गजन्य महामारीने ग्रासलेले आहे. त्यात सर्वसामान्य लोक अधिक भरडलेले आहेत. लोकांचे कामधंदे व व्यवसाय बंद आहेत. उलट या रोगाला सर्वसामान्यांना बळी जावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अचानक पडलेला आर्थिक बोजा, आणखी त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांना मात्र, हे वाईट दिवस कंठणे खूप मुश्किल होऊन बसलेले आहे.

मलठण हे गाव रांजणगाव MIDC लगत आहे. या ग्राम पंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व अन्य जाणकार मंडळींनी, MIDC मधील काही कंपन्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावासाठी मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केलेली होती. त्यास टाटा स्टील कंपनीने उत्तम प्रतिसाद देत, गावासाठी एक अत्याधुनिक व ऑक्सिजन युक्त अम्ब्युलन्स देण्याचे मान्य केले होते. या कंपनीने सुमारे चौदा लक्ष रुपये किंमत असलेली व टाटा कंपनीची मोटारगाडी असलेली ऑक्सिजन युक्त अम्ब्युलन्स भेट दिलीय. त्यामुळे खऱ्या अर्थाने मलठण व पंचक्रोशीसाठी ही अम्ब्युलन्स संजीवनी ठरणार असल्याचे मत, मलठण च्या सरपंच सौ. शशिकला नानाभाऊ फुलसुंदर यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केलेय.

टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या सी.एस.आर. योजने अंतर्गत, मलठण ग्रामपंचायतीला ऑक्सिजन ऍम्ब्युलन्स, शुक्रवार दि. ४ जून २०२१ रोजी, कंपनीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी सुपूर्द करण्यात आली.

हीचा उपयोग मलठण व पंचक्रोशीतील गोरगरिबांसाठी होणार आहे.

  मलठण ग्रामपंचायतीला सद्य कोरोना परिस्थिती मध्ये ऍम्ब्युलन्सची फार गरज भासत होती. परिस्थीतीची पाहणी करता कंपनी व्यवस्थापनाने, मलठण ग्रामस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दिनांक ०४/०६/२०२१ रोजी या ऍम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा, कंपनीचे बिझनेस हेड वेंकट पंपटवार व परिसरातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत छोटेखानी स्वरूपात पार पडला.
  या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना, कंपनीने केलेल्या विविध कामांची माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली. 
अम्ब्युलन्स वितरण सोहळ्याप्रसंगी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जी.प. सदस्य शेखर पाचुंदकर, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, मा. डी.वाय.एस.पी. बाळासाहेब पाचुंदकर, मोरे साहेब, मलठण च्या सरपंच सौ शशिकला फुलसुंदर, नानाभाऊ फुलसुंदर, नवनाथ शेवाळे, विनोद कदम, हेड ऑपरेशन विवेक पत्तेवार, हेड एच.आर. संतोष चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

   गोरगरिबांसाठी या ऑक्सिजन अम्ब्युलन्सचा उपयोग महत्वाचा ठरणार असल्याने, मलठणकर व पंचक्रोशीतील नागरिकांनी टाटा स्टील कंपनीच्या कामावर समाधान व्यक्त केले असून, मलठण ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याचेही कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *