६६ ‘तळीराम’ आणि ६२ ‘धूम’ स्टाईल चालकांवर कारवाई

दि .३०/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवारी रात्री मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ६६ ‘तळीराम’ आणि ६२ ‘धूम’ स्टाईल चालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

शहरातील नागरिक सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कालावधीत वाहतूक विषयक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांतताभंगाचे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस सज्ज झाले आहेत. काल गुरुवार २९ डिसेंबर रोजी पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. या मध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ६६ जण आणि, बेभान वाहने हाकणारे ६२ जन पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चिखली येथे 1 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी असणार आहे.तरी नागरीकांनी मद्य प्राशन करुन तसेच वेगाने वाहने चालवून स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका निर्माण करु नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तालयाने जाहीर केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *