अजित पवार हे शरद पवारांमुळे मोठे झाले, त्याचं कर्तृत्व काय? – चंद्रशेखर बावनकुळे

३० डिसेंबर २०२२

नागपूर


चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दीक वाद रंगला आहे. बावनकुळेंच्या विधानावर अजित पवारांनी लवकर संन्यास घेणार असल्याचे विधान केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे.

अजित पवार यांचे संन्यास घेण्याचे दिवस लवकर येतील. अजित पवार हे शरद पवारांमुळे मोठे झाले आहेत. त्यांचे काय कर्तृत्व आहे. पदावर बसले की सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता यापेक्षा काय केलयं. त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाची आम्ही वाट बघतोय, अशी टीका बावनकुळेंनी अजित पवारांवर केली आहे. बारामतीचा विकास म्हणजे लोकसभेचा विकास नाही. २०२४ मध्ये राष्ट्रवादी नक्की कमी होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *