शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व…

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि. ६ ऑगस्ट २०२१ ओझर: धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश दुरगुडे सर यांनी करुणामुळे पितृछत्र हरवलेल्या तीन विद्यार्थ्यांचे बारावी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च उचलला आहे. कोरोना काळात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली ,कोणाची आई हिरावली तर कुणाचे वडील .धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांचे वडील कोरोनाने गेल्याचे समजल्यावर या शाळेतील शिक्षक राजेश दुरगुडे सर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तीन विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी चे शैक्षणिक साहित्य त्यामध्ये दप्तर ,वह्या ,पेन पेन्सिल, कंपास असे सर्व शैक्षणिक साहित्य स्वखर्चातून घेऊन दिले आहे .यातील एक विद्यार्थी चौथीमध्ये आहे तर एक ८वी मध्ये व एक पहिली मध्ये आहे.यामध्ये दोन सख्खे भाऊ बहिण आहेत .राजेश दुरगुडे सर म्हणाले की या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारले असून यांचा बारावी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च मी स्वतः करणार आहे. मी केलेले कार्य खूप मोठे किंवा वेगळे नाही ,परंतु प्रत्येकाने जर पितृछत्र हरवलेल्या एका जरी मुलांची शैक्षणिक जबाबदारी उचलली ,त्याला शैक्षणिक साहित्य दिले, त्याला मानसिक आधार दिला तरी अशा अनेक मुलांचे शिक्षण थांबणार नाही. आणि त्यांना नक्कीच एक प्रकारचा आर्थिक मानसिक आधार मिळेल आणि त्यांना यातून जीवन जगण्याचे बळ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *