ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? गेले आहेत? की फक्त “कर नाटक”?; शिंदे गटाकडून पवारांवर टीका

०९ डिसेंबर २०२२


ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? की फक्त “कर नाटक “? असे खोचक ट्विट करत शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते नीलेश राणे यांनीही शरद पवारांना डिवचले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन बोलताना म्हणाले होते की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संयमाची परीक्षा बघू नये, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर ४८ तासांत मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, नेत्यांनी एकत्र येत, यावर मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.

या इशाऱ्याला ४८ तास उलटून गेल्यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत शरद पवारांना लक्ष्य केले. त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? की फक्त “कर नाटक ” ? तर भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केले आहे की, “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *