ग्रामीण भागातील पीएमपी मार्ग होणार बंद

११ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील ४० मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . त्याआधी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी महामंडळाच्या एसटी पुणे विभागाला एसटीची सेवा सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे एसटी सेवा नियमित झाल्यावर पीएमपी सेवा बंद होणार आहे .

पुणे आणि पिंपरी – चिंचवड हद्दीत पीमपीकडून १२९० बस चालवण्यात येतात . शहराबाहेर पीएमपीचे १०४ मार्ग सुरू आहेत . दररोज १० ते १२ लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात . शहरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता ही सेवा अपुरी पडत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून होत आहे . तसेच ग्रामीण भागात पीएमपी तोट्यात चालत होती . हेदेखील या मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण आहे . त्यामुळे पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाला पत्र पाठवून संध्या ‘ पीएमपी’च्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे पीएमपी ‘ प्रशासनाला या मार्गावरील बससेवा तत्काळ बंद न करता टप्प्याटप्प्याने कमी करण्याची सूचना दिली आहे . एसटी बस पूर्ण क्षमतेंने सुरू झाल्यानंतर या मार्गावरील पीएमपी बससेवा बंद करण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *