तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपाचे आंदोलन

संसदेत उपराष्ट्रपती यांची ‍नक्कल केल्याबददल काँग्रेस आणि समविचारी पक्षाचा निषेध‍

 

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांची नक्कल केली. या घटनेचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चित्रण करून हास्य उडविले. या घटनेचा निषेध म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २१ रोजी सकाळी काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांनी केलेल्या या कृतीच्या विरोधात ‘निषेध आंदोलन’ पार पडले.

यावेळी, भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, शैला मोळक, नगरसेवक माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, शिवराम पाटील, वैशाली खाडये, रविंद्र नांदुरकर, निलेश अष्टेकर, मधुकर बच्चे, प्रदीपकुमार बेंद्रे, रविंद्र देशपांडे, दिपक भंडारी, आकाश भारती, सचिन काळभोर, गणेश संभेराव, नंदू कदम, संजय बढे, देवराम महाजन, प्रताप सोलंकी, राकेश सिंग ठाकूर,प्रिती कामतीकर, सीमा चव्हाण, प्रज्ञा हितनाळीकर, कैलास सानप, निता कुशारे, पल्लवी मारकड, अलका मकवाना, जयश्री मकवाना, जयश्री काशीद, राजश्री शाह, शाकीर शेख, जयश्री वाघमारे, रफीक खान, गणेश ढाकणे, अजित कुलथे, संजय परळीकर, साहिल जगताप यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, वॉरियर्स, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसंगी, संवैधानिक पदाचा अवमान करणा-या खासदारांविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करत होते. राहुल गांधी हे त्यांचे चित्रण करत होते. काँग्रेसने देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची खिल्ली उडवली. याचा हिशेब आगामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच चुकता करावा लागेल. ‘उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीचा आम्ही तीव्र निषेध करतो. विरोधक सर्व मर्यादा ओलांडत आहेत. घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा ते सातत्याने अपमान करत आहेत. राष्ट्रपती दलित महिला असल्याने विरोधकांनी त्यांचा अपमान केला होता. उपराष्ट्रपती पदाचाही विरोधकांनी अवमान केला. उपराष्ट्रपती आणि संविधानाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. भारत उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही. राहूल गांधी आणि तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जीं यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची व देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *