वेड्या लोकांचा प्रमुख वेडा, ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट ३ – नितेश राणे

२९ डिसेंबर २०२२


मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला. शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा!, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला पाहिजे, असं नितेश राणे म्हणालेत. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा! ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट ३ असंही राणे म्हणाले. तसेच संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला आहे. आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचं रुग्णालय असेल तिथे संजय राऊत यांना ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी. असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *