मी तर विचार करतोय की, राजकारणातून संन्यास घ्यावा…. अजित पवार यांनी उडविली बावनकुळे यांची खिल्ली

दि. २९/१२/२०२२
नागपूर


नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बुधवारी नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना बारामतीमध्ये हुकुमशाही कारभार सुरू आहे.माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल”, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची आज गुरुवारी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे.

याविषयी बोलताना पवार म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते वक्तव्य ऐकल्यापासून माझी झोपच उडाली आहे. मला तेव्हापासून आम्हा सर्वांची झोप हरपली आहे. एवढा मोठा ताकदीचा नेता, अशा पद्धतीचे आव्हान देत आहे. मी तर विचार करतोय की, राजकारणातून संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा.’ अशी खोचक टिप्पणी पवार यांनी केल्यानंतर आता भाजपच्या गोटातून नेमकी काय प्रतिक्रिया उमटते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *